आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग सीरिजमधला पहिला सामना पार्ल इथं सुरु
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग सीरिजमधला पहिला सामना आजपासून पार्ल इथं सुरु झाला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेतल्या पहिला सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या जसप्रीत बुमराहनं पाचव्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर जानेमन मलानला केवळ ६ धावांवर बाद केलं.कर्णधार म्हणून के. एल. राहुलचा हा पहिलाच एकदिवसीय सामना आहे. रोहित शर्माच्या दुखापतीमुळं राहुलकडं संघांचं नेतृत्व आलं आहे. या सामन्यातून व्यंकटेश अय्यरनं आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात पदार्पण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या १५ व्या षटकात १ बाद ५७ धावा झाल्या होत्या.