Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं १६१ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं १६१ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळपासून ६० लाखापेक्षा नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६१ कोटी ३ लाखाच्या वर गेली आहे.  यापैकी  ६७ कोटी ७६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दोन मात्रा, तर ७१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ या वयोगटात आत्तापर्यंत ४ कोटींपेक्षाजास्त लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. राज्यातही आज सकाळपासून ४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. आत्तापर्यंत राज्यात साडे १४ कोटींपेक्षा जास्त लसमात्रा दिल्या आहेत. यापैकी ५ कोटी ९५ लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना दोन, ५ लाख ५३ हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांना वर्धक, तर १५ ते १८ या वयोगटातल्या २८ लाख ८१ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे.

Exit mobile version