चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला राष्ट्रीय हरित लवादानं ठोठावला ५ कोटी रुपयांचा दंड
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादानं ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वीज केंद्रातील प्रदूषणावर आळा न घातल्याने एन. जी.टी नं हा आदेश दिला आहे. चंद्रपूर औद्योगिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन रुंगठा यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राविरुद्ध या संदर्भात याचिका दाखल केली होती त्यानंतर विज केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश देखील देण्यात आले असून. या समितीत पर्यावरण मंत्रालयाच्या क्षेत्रीय समितीचे सदस्य, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.