दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्याएकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना केप टाऊनमध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकजिंकून भारतानं दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. कर्णधार के. एल. राहुलचानिर्णय अचूक ठरवत भारतीय गोलंदाजांची दक्षिण आफ्रिकेचे २ खेळाडू झटपट बाद केले. अवघ्या आठ धावांवर असताना दीपक चाहरच्या चेंडूवर रिषभ पंतनं जानेमन मलान याचा झेल टिपला, तर टेंबाबावुमा याला अवघ्या आठ धावांवर राहुल लोकेशनं धावचीत केलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हादक्षिण आफ्रिकेच्या १२ षटक आणि २ चेंडूत ३ बाद ७० धावा झाल्या होत्या.