प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्भया पथक, निर्भया सक्षम केंद्र आणि इतर उपक्रमांचं उद्घाटन
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निर्भया पथक, निर्भया सक्षम केंद्र आणि संबंधित इतर उपक्रमांचं उद्घाटन केलं. राज्याचं पोलीस दल कौतुक करावं, असं काम करत असल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचं ते म्हणाले. महिला आणि राज्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हणत प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत असलेल्या महिला असहाय्य राहू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करायची गरजही त्यांनी व्यक्त केली. पोलीस दल सक्षम करण्याच्या कामात सरकार कुठेही मागे राहणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मंत्री, तसंच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळे चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी निर्मिती केलेल्या निर्भया थीमचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झालं. १०३ हा मदत क्रमांक डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळेल. यासाठी पथकातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना डेटा सुविधासह फोन उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली