कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १६३ कोटी मात्रांचा टप्पा पार
Ekach Dheya
Tezpur: A COVID-19 suspected family being taken to Tezpur Medical College and Hospital, at a containment zone in Tezpur, Saturday, Aug 1, 2020. (PTI Photo)(PTI01-08-2020_000135B)
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १६३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळपासून सुमारे ६ लाख नागरिकांचे लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६३ कोटी ६३ लाखांच्या वर गेली आहे. यात ६९ कोटी २७ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा, तर सुमारे ९० लाख ७० हजार पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ४ कोटी ३५ लाख ४० हजारांहून जास्त लाभार्थ्यांना पहिली मात्रा मिळाली आहे. महाराष्ट्रात आज सकाळपासून सुमारे २ लाख ३२ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत १४ कोटी ६९ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत.