फिट इंडिया प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत उत्तर प्रदेशातील विद्यार्थी आघाडीवर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांसाठी आयोजित देशातल्या सर्वात मोठ्या क्रीडा आणि तंदुरूस्तीविषयी पहिल्या फीट इंडिया प्रश्नमंजुषेच्या पहिल्या फेरीचे निकाल जाहीर झाले आहेत. या फेरीत उत्तर प्रदेशातील दोन तरूणांनी पहिल्या फेरीत सर्वोच्च गुण मिळवले आहेत. युवक आणि क्रीडा मंत्रालयाकडून देशपातळीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत देशभरातील ६५९ जिल्ह्यातल्या १३ हजार ५०२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आता राज्य पातळीवर फेऱ्यांसाठी ३६ राज्यामधील ३६१ शाळांमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. या स्पर्धेतील विविध फेऱ्यांमधल्या विजेत्यांना ३ कोटी २५ लाख रूपयांची पारितोषके देण्यात येणार आहेत.