प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील कलाकारांद्वारे भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांच सादरीकरण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात यावर्षी प्रथमच भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार कथ्थकचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या शेंदुर्णी गावातल्या ऐश्वर्या साने यांच्या ग्रुपचं कथ्थक नृत्य उद्या राजपथावर होणाऱ्या संचलनात सादर होणार आहे. यामुळे खानदेशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या नृत्याविष्काराची संकल्पना ‘विविधतेतील एकता’ अशी आहे. त्यात कथ्थकसह भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली, ओडिसी, मणिपुरी, कुचिपुडी अशा अन्य भारतीय नृत्यशैलींचाही समावेश आहे. शिवाय लोकनृत्य आणि आदिवासी नृत्याचाही अंतर्भाव आहे.