प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांमधल्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या परिषदेचं आयोजन करण्यात येतं आहे. कझाकस्तान, किरगिज प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रपती यात सहभागी होणार आहेत. २०१५ मध्ये प्रधानमंत्र्यांनी या देशांना भेट दिली होती. त्यानंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. या परिषदेत प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.