Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६३ कोटी ८४ लाख लसमात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६३ कोटी ८४ लाख लसमात्रा देण्यात आल्या अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या २४ तासात २२ लाख ३५ हजार पेक्षा जास्त लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. सध्या देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या २२ लाख दोन हजार ४७२ असून तीन लाख ६ हजार ३५७ जण काल कोविडमुक्त झाले.  देशातील कोविड संसर्गाचा दर ५.४६ टक्के आणि बरे होण्याचा दर ९३.३३ टक्के आहे. गेल्या २४ तासात २ लाख ८६ हजार ३८४ नवीन रुग्ण नोंदवले गेले.

Exit mobile version