Site icon साप्ताहिक एकच ध्येय

६ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांना सुरूवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. येत्या ६ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामन्यांना सुरूवात होईल, तर १६ तारखेपासून कोलकाता इथल्या ईडन गार्डन्सवर तीन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. दुखापतीमुळे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकलेला रोहित शर्मा एकदिवसीय संघ आणि टी-२० संघाचे नेतृत्व करण्यासाठी परतला आहे. माजी कर्णधार विराट कोहलीचा एकदिवसीय आणि टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. के.एल राहुलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताच्या एकदिवसीय संघात दीपक हुडाचीही निवड करण्यात आली आहे. भारताचा एकदिवसीय संघ अशा प्रमाणे आहे- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि आवेश खान, तर भारताचा टी-२० संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल

Exit mobile version