Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार

पिंपरी : निवडणूक कालावधीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खेड विधानसभा मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल. निवडणूक शांततेत पार पडावी. यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. निवडणुकी दरम्यान येणारा नवरात्रोत्सव शांततेत व्हावा यासाठी नियोजन केले जाईल, असे पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितले.

मावळते पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडून नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिष्णोई यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या कामगिरीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version