पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समाविष्टगावात विकासकामांचा धडाका सुरु होणार आहे. भोसरी मतदारसंघातील गायरानाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मान्यता दिली. अशी माहिती आमदार महेशदादा लांडगे यांनी दिली.
अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित होता. तत्कालीन सत्ताधा-यांना हा प्रश्न सोडविता आला नाही. जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाली नसल्याने समाविष्ट गावातील विकासकामांना खीळ बसली होती. निधी असूनही केवळ जागे अभावी अनेक विकासकामे रखडली होती. गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार त्यांनी पाठपुरावा सुरु केला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, बैठका घेतल्या.
त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भोसरी मतदारसंघातील 27 हेक्टर गायरान जागा पिंपरी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावात विविध विकास कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये शासकीय गायरान जमीन असल्याने मंजूर विकास आराखड्यामध्ये रस्ता रुंदीकरणाचे प्रश्न प्रलंबित होते. आता जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यामुळे रस्त्याचे प्रश्न निकालात निघणार असल्याचे आमदार लांडगे म्हणाले.
समाविष्ट गावात वाहणार विकासाची गंगा – आमदार महेशदादा लांडगे
महापालिकेच्या माध्यमातून समाविष्ट गावात यापूर्वीच मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आता गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाली आहे. त्यामुळे समाविष्ट गावात अनेक सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यामध्ये शाळा, उद्यान, रुग्णालये, अग्निशमन केंद्र, पाण्याची टाकी, दफनभूमी प्रशस्त रस्ते करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘या’ गायरान जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण
दिघी सर्व्हे नंबर 66, क्षेत्र 3 हेक्टर 80 आर-आरक्षण क्रमांक 2/115 (उद्यान), आरक्षण क्रमांक 2/188 – क्षेत्र 0.60 आर, 0.15 आर, 0.95 आर (दफनभूमी, 12 मीटर रस्ता), तळवडे सर्व्हे नंबर 1 ब – क्षेत्र 0.97 आर (18 मीटर रस्ता), 0.50 आर, आरक्षण क्रमांक 1/50 (पाण्याची टाकी), 0.40 आर आरक्षण क्रमांक 1/54 (प्राथमिक शाळा), 0.05 आर आरक्षण क्रमांक 1/55 (पोलीस स्टेशन), 0.40 आर एकूण 2 हेक्टर 25 आर आरक्षण क्रमांक 1/57 (अग्निशमन केंद्र), चिखली सर्व्हे क्रमांक 1653 – 2 हेक्टर आरक्षण क्रमांक 1/88 (रुग्णालय), 1 हेक्टर आरक्षण क्रमांक 1/88 अग्निशमन केंद्र, 1 हेक्टर 62 आर आरक्षण क्रमांक 1/88 (प्राथमिक शाळा), 1 हेक्टर 55 आर (एकूण 6 हेक्टर 17 आर) (12, 18 मीटर रस्ता),
मोशी गट नंबर 467, क्षेत्रफळ 2 हेक्टर 43 आर, आरक्षण क्रमांक 1/195 (उद्यान), 0.82 आर (एकूण 3 हेक्टर 25 आर) (60 मीटर, 18 मीटर रस्ता), मोशी गट नंबर 646, क्षेत्रफळ 6 हेक्टर आरक्षण क्रमांक 1/189 (उद्यान), 0.80 आर (एकूण 6 हेक्टर 80 आर) (90 मीटर आणि 18 मीटर रस्ता) ही गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्यता दिली आहे.
दिघीतील सर्वे नंबर 66 95 आर, 77 सर्व्हेमधील 3 हेक्टर 80 आर, तळवडेतील सर्व्हे नंबर 1 मधील 2 हेक्टर 25 आर, चिखलीतील सर्व्हे नंबर 1653 मधील 6 हेक्टर 17 आर, मोशीतील सर्व्हे नंबर 467 मधील 3 हेक्टर 25 आर आणि मोशीतीलच 646 सर्व्हे मधील 6 हेक्टर 80 आर अशी एकूण 27 हेक्टर 80 आर जागा महापालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. या जागेची सरासरी 270 ते 300 कोटी रुपये किंमत आहे.