निवडणुकीत ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याच्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्ग – ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेतच आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात आलं होतं. यामुळे ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत निवडणुकीत २७ टक्के आरक्षण देण्याचा कायदा संमत झाला आहे.