Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात १ लाख ९१ हजार ५२४ सक्रीय रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीहून अधिक होती. काल १४ हजार ३७२ नव्या रुग्णांची नोंद झाली. ३० हजार ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर ९४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३५ हजार ४८१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७३ लाख ९७ हजार ३५२ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४२ हजार ७०५ रुग्ण दगावले. सध्या राज्यात १ लाख ९१ हजार ५२४ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ पूर्णांक ६३ शतांश टक्के झालं आहे. तर मृत्यूदर १ पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही. राज्यात आतापर्यंत ३ हजार २२१ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १ हजार ६८९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.

Exit mobile version