कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज ओलांडला १६८ कोटी मात्रांचा टप्पा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १६८ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून १८ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या एकूण मात्रांची संख्या १६८ कोटी ३ लाखांच्यावर गेली आहे. त्यात ७१ कोटी ९५ लाख ७८ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १ कोटी २९ लाख ८५ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ५ कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीची पहिली मात्रा मिळाली आहे.