Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सर जे जे कला महाविद्यालय परिसरात शिल्पकलेचे जतन करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई : विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिल्पाचा योग्य वापर करून त्या शिल्पकलेचे जतन करावे, असे निर्देश देत सर जे जे कला महाविद्यालय परिसराची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली.

यावेळी सर जे जे कला महाविद्यालयाचे संचालक राजीव मिश्रा, अधिष्ठाता संतोष क्षीरसागर, विश्वनाथ साबळे, कला व शिल्प निरीक्षक संदीप डोंगरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव श्री. तिडके व संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, या परिसरात विद्यार्थी शिल्प बनवून आपली कला सादर करतात त्या शिल्पाचे योग्य असे जतन करणे गरजेचे आहे. त्यामुळे परिसरातील शिल्पांचे विविध ठिकाणी  प्रदर्शन भरवून  त्याचे महत्त्व पटवून द्यावे. आणि ज्या ठिकाणी वस्तुसंग्रहालय आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी शिल्प ठेवले तर त्यांचे आयुष्य आणखी वाढेल. परिसरातील इमारत हेरीटेज असल्याने सुशोभिकरण करण्यासाठी  10 कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून या महाविद्यालयाच्या परिसरातील कार्याला निधी कमी पडू देणार नाही, असेही श्री. सामंत यांनी सागितले. मात्र परिसरात स्वच्छ व सुंदर असावा अशी अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांनी परिसरात  बनवलेल्या विविध  चित्र व शिल्पाची पाहणी करून त्याच्या कार्याची माहिती घेत श्री.सामंत त्याची प्रशंसा केली.

Exit mobile version