कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांहून अधिक व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळाली आर्थिक मदत
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत देण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली. देशभरात आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सर्वाधिक जणांना या मदतीचं वाटप झालं आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजारांहून अधिक व्यक्तींचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर सव्वा दोन लाखाहून अधिक अर्ज मदतीसाठी आले होते. एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी कुटुंबातल्या एकापेक्षा अनेक व्यक्तींनी मदतीचे अर्ज केले होते. अशाप्रकारचे ६१ हजारांहून अधिक अर्ज नाकारण्यात आले आहे. कुटुंबातल्या लोकांनी एकमतानं एकच अर्ज दाखल करावा असं आवाहन त्यांनी केली. पुनरुक्ती टाळून २० हजारांहून अधिक अर्ज पुन्हा सरकारकडे आले आहेत.