Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रायगड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीनं बाधित गावांसाठी १३ कोटींहून अधिक रुपयांचा निधी

मुंबई (वृत्तसंस्था) : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानं बाधित झालेल्या, रायगड जिल्ह्यातल्या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. २२ आणि २३ जुलै २०२१ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात तळीये, कोंडाळकरवाडी, बौध्दवाडी, केवनाळे, तर पोलादपूर तालुक्यात साखर -सुतारवाडी, ही गावं बाधित झाली होती. तसंच मनुष्यहानी देखील झाली होती. दरड कोसळून बाधित झालेल्या नागरीकांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी भुसंपादन, नागरी आणि सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा, जल जीवन इत्यादि कामांसाठी हा निधी मंजूर केला आहे.

Exit mobile version