चीनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाताना विशेष काळजी घेण्याचं केंद्र सरकारचं विद्यार्थ्यांना आवाहन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी परदेशात जाताना विद्यार्थ्यांनी संबंधीत देश निवडताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन राष्ट्रीय वैद्यकीय नियामक आयोगानं केलं आहे. विशेषत: चीनच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन प्रशासनानं परदेशी विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी बंदी आणली आहे. तरिही काही चीनी वैद्यकीय विद्यापीठं परदेशी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी निमंत्रणं देत आहेत. खबरदारीची बाब म्हणून आयोगानं परराष्ट मंत्रलयाच्या इशाऱ्या नंतर हे आवाहन केलं आहे. कोरोनामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना आपलं वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून चीनमधून मायदेशी परतावं लागलं होतं त्यांना आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अजूनही चीनमध्ये जाता येत नाहीये म्हणून हा इशारा वजा आवाहन देशातल्या इच्छुक विद्यार्थ्यांना करण्यात आला आहे.