२०२४ पर्यंत कृषीक्षेत्रात डिझेलऐवजी संपूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेचा वापर करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी क्षेत्रात होत असलेला डिझेलचा वापर २०२४ पर्यंत पूर्णपणे थांबवून त्याऐवजी नवीकरणीय ऊर्जेचा वापर केला जाईल, असं केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी म्हटलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ऊर्जामंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
ऊर्जा बचत आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासंदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ऊर्जा बचत आणि संरक्षणासाठी राज्यांना स्वतंत्र संस्था स्थापन करावी, तसंच राज्यांना दिलेलं लक्ष्य साध्य करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा असं ते म्हणाले.
ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी जीवाश्मेतर इंधन आणि ऊर्जा साठवणूक तंत्रांचा वापर केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.