देशात रोजगाराच्या संधी वाढत असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिमाही रोजगार सर्वेक्षण आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या आकडेवारीवरून देशात रोजगार वाढत असल्याचं स्पष्ट होतयं, असं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ते काल गुरूग्राम इथं कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या बैठकीत बोलत होते. देशात रोजगाराच्या संधी वाढत असून केंद्र सरकार संघटीत आणि असंघटीत अशा सर्व कामगारांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयांमध्ये कामगारांच्या आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली, असून कारखाने आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या समन्वयानं कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. प्रायोगिक तत्त्वावर १५ शहरांमध्ये ही योजना राबवली जाईल असं त्यांनी सांगितलं.