भारतीय सेनेच्या गणवेशाचं उत्पादन सोलापुरात घेण्याची मागणी – खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय सेनेच्या गणवेशाचं उत्पादन सोलापुरात घेतलं जावं अशी मागणी खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभेत शून्य प्रहरात प्रश्न उपस्थित केला, तसंच संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना या मागणीचं निवेदनही दिलं आहे. सोलापूर वस्त्रोद्योगाचं हब म्हणून ओळखलं जातं, गणवेश निर्मितीत सोलापूर गारमेंट, युनिफॉर्म हब म्हणून प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीही सोलापुरातल्या वस्त्र उत्पादकांकडून सैन्याचे गणवेश तयार करून घेता येऊ शकतात असं २०१४साली म्हटलं होतं. असं डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.