स्वतंत्रता सेनानी,प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वतंत्रता सेनानी, प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती आहे. नागरिकांचे अधिकार, महिला सबलीकरण आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या त्या खंद्या समर्थक होत्या. सरोजिनी नायडू या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष अध्यक्ष होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. असहकार आंदोलन आणि भारत छोडो आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. उप-राष्ट्रपति एम. वेंकैया नायडू यांनी सरोजिनी नायडू यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वातंत्र्य लढ्यातल्या त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचं सदैव स्मरण केलं जाईल, असं उपराष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.