पिंपरी : आपण पाहत असलेल्या ह्या फोटोतील रस्ता कोणत्या जंगलातील नसून, नागरिकांच्या कररुपी जमा होणाऱ्या पैशातून, पिंपरी चिंंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील काळेवाडी येथे तयार केलेल्या रस्त्याचा आहे.
वरील फोटोत दिसत असलेला रस्ता हा काही कोणत्या जंगलातील पायवाट अथवा जंगलामधिल नाही, तर मनपा ने जवळपास 11कोटी रुपये खर्च करून विकसित करत असलेल्या रस्त्याचा आहे. ठेकेदाराने 60% काम करून, अर्धवट सोडलेल्या या रस्त्याबाबत, ना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना फिकीर, ना आयुक्तांना!
नागरिकांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशाने भरलेल्या मनपाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या ठेकेदारांंवर मेहेरबानी करणाऱ्या, संबंधित बेफिकीर कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अशी मागणी माहिती जागृत नागरिक महासंघ महराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयुक्त श्रावण हार्डिकर यांंना करण्यात आली आहे.
काळेवाडी पुलापासून ते भाटनगर एस. टी. पी. पर्यंत जवळपास 11 कोटी रुपयेे खर्चून, नदीच्या बाजूचा 18 मीटर रस्ता विकसीत करण्याच्या कामाची मुदत संपून 5 महिने झालेले आहेत. तसेच याच रस्त्यावरील नाल्यांवर पूल बांधण्याच्या कामाची मुदत संपून काही महिने झाले. तरीही काम अपूर्ण आहे. अशा वेळी कामात हलगर्जीपणा व वेळकाढूपणा करणाऱ्या ठेकेदाराकडून जबरी दंड वसूल करण्याऐवजी, त्याला मुदत वाढ देऊन आपला वाटा काढूून घेण्यात, अधिकाऱ्यांना रस असल्याची शंका येत आहे.
याविरुद्ध पिंंपरी चिंंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करीत आहोत. अशी माहिती जागृत नागरिक महासंघ महराष्ट्र राज्य अध्यक्ष नितीन यादव यांनी साप्ताहिक एकच ध्येेेयचे सहसंपादक स्वस्तिक आवटे यांंना दिली.