माजी मंत्री शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना नेते माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या पार्थिवावर आज मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं मुंबईतल्या जसलोक रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांना आवाज देणारा सहृदयी नेता म्हणून सुधीर जोशी यांच्या निधनामुळे गमावला आहे. त्यांच्यासारखे व्रतस्थ आणि निष्ठावान असे उदाहरण आता दुर्मिळ झाले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली आहे.