‘सिट्रस इस्टेट’ या योजनेच्या अंमलबजावणीकरता १३ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मोसंबी पिकासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सिट्रस इस्टेट’ या योजनेच्या अंमलबजावणीकरता २०२१-२०२२ या सालासाठी १३ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी काल ही माहिती दिली. ते काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना बोलत होते. या साठी ९ कोटी ९३ लाख रुपये तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश त्यांनी संबंधीत विभागाला दिले आहेत