ऊर्जा मंत्रालयातर्फे हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनाकरिता नवे धोरण जारी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयानं नवीकरणीय स्त्रोतांचा वापर करून हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनासाठी हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया धोरण जारी केलं आहे. भविष्यात जीवाश्म इंधनाची जागा घेणाऱ्या या इंधनांचं उत्पादन करणं ही पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत अत्यावश्यक आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे देशातल्या जनतेला स्वच्छ इंधन मिळेल आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होईल, तसंच कच्च्या तेलाची आयातही कमी होईल. जीवाश्म इंधन आणि जीवाश्म इंधनावर आधारित खाद्य साठ्यापासून हरित हायड्रोजन आणि अमोनियानिर्मितीकडे होणारी वाटचाल अधिक सुलभ करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असून, हे धोरण म्हणजे त्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे.