गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन झाले आहेत. याच मोबाइलच्या व्यसनातून दिलासा देत सृजन कला जिवंत ठेवण्यासाठी अमरावती इथल्या गार्डन क्लबच्या वतीनं दोन दिवसांचं पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
यामध्ये पाचशेपेक्षा अधिक झाडं, ३०० पेक्षा अधिक पुष्प आणि पारंपारिक वृक्षांना, विज्ञानाचा आधार घेऊन तयार केलेले बोनसाय वृक्षांचा समावेश आहे. या प्रदर्शनास नागरिकांची देखील पसंती मिळत आहे.