पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये अपंगांसाठी स्वतंत्र वाहन तळ आहे. या वाहन तळापासून अपंग व्यक्तींना जाण्यासाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात आलेला आहे. या रॅम्पवरून अपंग बांधव ये-जा करत असतात परंतू, काही वाहनचालक रँम्प जवळ राजरोसपणे वाहने लावून महापालिकेत कामानिमित्त जात असतात, त्यामुळे अपंग बांधवांना कामानिमित्त महापालिकेत आल्यानंतर आतमध्ये जाताना आणि येताना त्रास होत असतो. याबाबत सतत सुरक्षा विभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने नगर सचिव तथा नागरवस्ती विभागाचे सहायक आयुक्त उल्हास जगताप यांना घटनास्थळी बोलावून, या प्रकाराची माहिती दिली. यावेळी जगताप यांनी सुरक्षा विभागाला तातडीने आदेश दिले. यानंतर वाहणे लागणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. यावेळी अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, संगीताताई जोशी, विद्याताई तांदळे, रमेश शिंदे, संगीता पटेल आदी उपस्थित होते