Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पायाभूत क्षेत्रातली गुंतवणूक दीर्घकालीन परिणाम देणारी असल्यानं अर्थसंकल्पात यासाठी सर्वाधिक तरतुद केल्याची अर्थमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पायाभूत क्षेत्रांमधली गुंतवणूक बऱ्याच काळपर्यंत फायदा देणारी असते,  त्यामुळे या क्षेत्रातल्या गुंतवणुकीवर अर्थसंकल्पात भर दिला आहे. अर्थव्यवस्थेत निरंतर सुधार हे उद्दिष्ट समोर ठेवूनच या वर्षीचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पानंतर आज मुंबईत त्यांनी उद्योजकांची भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातल्या अर्थसंकल्पात येत्या २५ वर्षाच्या देश विकासाचा आराखडा असल्याचं त्यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा करासंबंधातले निर्णय केंद्र सरकार घेत नाही तर जीएसटी परिषद एकमतानं घेते. त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असतो. त्यामुळं जीएसटीवर टीका करणारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे परिषदेवर टीका करतात असं त्या म्हणाल्या.

Exit mobile version