Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून ७६३ कोटी रुपयांची वाढीव मदत जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाडा विभागात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारनं ७६३ कोटी रुपयांची वाढीव मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी केला आहे. विभागात बीड जिल्ह्याला सर्वाधिक १४२ कोटी ३१ लाख, नांदेड १३६ कोटी ६९ लाख, औरंगाबाद जिल्ह्याला ९८ कोटी ८६ लाख, जालना ९३ कोटी २७ लाख, लातूर ९७ कोटी ४९ लाख, उस्मानाबाद ७१ कोटी ११ लाख, परभणी ६७ कोटी ६१ लाख, तर हिंगोली जिल्ह्याला ५६ कोटी १७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्यामार्फत विभागातल्या आठही जिल्ह्यांना हा निधी वितरीत केला जाणार आहे.

Exit mobile version