भारत आणि वेस्टइंडिज तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा १७ धावांनी विजय
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात काल कोलकत्ता इथं झालेला तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं १७ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही मालिकाही ३-० अशी जिंकली. कालच्या सामन्यात वेस्टइंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. सुर्यकुमार यादवनं केलेल्या ६५ धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे भारतानं विंडीजसमोर विजयासाठी १८५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात वेस्टइंडिज निर्धारीत २० षटकांमध्ये ९ गडी बाद १६७ धावाच करू शकला. वेस्टइंडिजच्या वतीनं निकोलस पुरन यानं मालिकेतलं सलग तीसरं अर्धशतक झळकावत ६१ धावा केल्या. भारताच्या सुर्यकुमार यादव याला सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्कारानं गौरवलं केलं. या मालिका विजयामुळे आयसीसीच्या टी.ट्वेंटी क्रमवारीत भारत इंग्लंडला मागे टाकून पहिल्या स्थानावर पोचला आहे. याआधी २०१६ मध्ये महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदा अव्वल स्थानी पोचला होता.