नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत मंत्रालयात महात्मा गांधी स्मारक परिसरात निदर्शनं करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळातले मंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे, जयंत पाटील, सुभाष देसाई खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर मंत्री यावेळी उपस्थित होते. मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेणार नसल्याचंही महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. आंदोलनानंतर पोलिसांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.दरम्यान, मलिक यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनंही राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.