Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मानवतावादी कार्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून युक्रेनला 20 दशलक्ष डॉलरची मदत

H.E. Mr. Jorge Marcelo Faurie (Minister for Foreign Affairs, REPUBLIC OF ARGENTINA)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्शवभूमीवर संयुक्त राष्ट्र संघानं युक्रेनला २० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. ही घोषणा संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरर्स यांनी काल केली. युक्रेनमधल्या जनतेला मानवतेच्या आधारावर युद्धासारख्या कठीण प्रसंगात मदत करण्यास संयुक्त राष्ट्र संघ आणि त्याचे मानवतावादी भागीदार देश बाध्य आहेत, असं महासचिवांनी म्हटलं आहे. ही मदत युक्रेनमधल्या जनतेला आरोग्य सेवा, अन्न – निवारा यासारख्या पायभूत सुविधा पुरवण्यात उपयोगी पडेल असं संयुक्त राष्ट्र संघाचे मानवहीतकारी गटाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version