Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुणेकरांना धोलेरा सर प्रकल्पात गुंतवणुकीची संधी

पुणे : गुजरातमधील अहमदाबाद या अत्यंत महत्त्वाच्या शहरालगत जगातील आकाराने सर्वांत मोठ्या नियोजित ग्रीन स्मार्ट सिटीचे काम प्रगतिपथावर असून यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आता पुणेकरांनाही उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन जेएमपीसी जे. जोशी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. चे संचालक डॉ. जिग्नेश जोशी यांनी येथे केले.

स्मिता मंडेविया, माली रीपब्लिकच्या कॉन्सुलेट, भीमसेन आगरवाल, एस्सेन ग्रुप, सूर्यकांत काकडे, काकडे ग्रुप, राजेंद्र पवार, रोशनी कन्स्ट्रक्शन्स हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते.

धोलेरा सर या प्रकल्पातील गुंतवणुकीची पुणेकरांना संधी या विषयावरील एका चर्चासत्रात डॉ. जोशी बोलत होते. या नियोजित ग्रीन स्मार्ट सिटीची रचना हाँगकाँग आणि सिंगापूर या उच्चभ्रू शहरांपेक्षा चांगली असल्याचे सांगून ते म्हणाले की अहमदाबाद जिल्ह्यातील धोलेरा तालुक्यातील सुमारे 22 खेड्यांना आपल्या कवेत घेतलेली ही हायटेक ग्रीनफील्ड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी अहमदाबाद शहरापेक्षा क्षेत्रफळाने मोठी व दिल्ली या राजधानीच्या शहरापेक्षा दुप्पट मोठी आहे.

आयएसओ 37120 ने मानांकित धोलेरा सर हे नियोजित शहर ब्रिटनच्या हालक्रो कंपनीने आरेखित केले असल्याचे सांगून जेएमपीसी जे. जोशी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय शहा म्हणाले की एईकोम या नामवंत कंपनीकडे संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम सोपवले आहे. माहिती, संपर्क आणि तंत्रज्ञानविषयक सल्ला विप्रो ही दर्जेदार कंपनी देणार आहे. प्रकल्पाच्या प्रगत व्यवस्थापनासाठी आयबीएम आणि सिस्को यांची नेमणूक करण्यात आली आहे.

धोलेरा सर या प्रकल्पाच्या अन्य महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना संचालक डॉ. जिग्नेश जोशी यांनी सांगितले की अत्यंत अद्यावत अशा या नियोजित शहरात आम्ही प्लॉट विक्री सुरू केली असून पुणेकरांनाही अशा महत्त्वाच्या शहरात प्लॉट घेण्याची संधी आता प्राप्त झाली आहे. सुमारे 1600 एकर जमीन आमच्याकडे असून ती सर्व निर्वेध व क्लिअर टायटल आहे. पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या परदेश व्यापार दौर्‍यात मी सहभागी झालो आहे. आतापर्यंत 28 प्रकल्पांचे काम सुरू झाले असून 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अशा या अत्यंत महत्त्वाच्या शहरात आपण सुमारे 2000 स्क्वे.फू.पासून पुढे जमीन घेऊ शकता. पुणेकरांना आपला प्लॉट बुकिंग करणे सोपे व्हावे म्हणून चॅनेल सहकार्‍यांची नेमणूक केली गेलेली आहे. तरी या सुसंधीचा फायदा पुणेकरांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. जिग्नेश जोशी यांनी केले आहे.

पुणे, कोल्हापूर, नासिक, ठाणे, दिल्ली, चंदीगढ व गोव्यामध्ये आमची कार्यालये सुरू झाली असल्याचे सांगून डॉ. जोशी म्हणाले की बेस्ट डेव्हलपर पुरस्काराने आम्ही सन्मानीत झालो आहोत.

Exit mobile version