वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्यानं महावितरण आर्थिक संकटात
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्यानं महावितरण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकानं देयकांची थकबाकी भरून महातिवरणला सहकार्य करावं, असं आवाहन ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं आहे. ते काल बुलढाणा जिल्ह्यात खामगांव इथं एका कार्यक्रमात बोलत होते.
महावितरणला देखील बाहेरून, पैसे देऊन वीज खरेदी करावी लागते, असं त्यांनी सांगितलं. महापारेषणच्या धरणगाव वीज उपकेंद्राचं लोकार्पण आणि मनसगाव इथल्या वीज उपकेंद्राचं भूमीपूजन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, आमदार राजेश एकडे, माजी आमदार दिलीप सानंदा, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.