राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत केंद्र सरकारकडून १ हजार ६८२ कोटी रूपयांहून अधिक अतिरिक्त सहायता निधी मंजूर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत महाराष्ट्रासह पाच राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी केंद्र सरकारनं एक हजार ६८२ कोटी रूपयांहून अधिक अतिरिक्त केंद्रीय सहायता निधीला मंजुरी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या उच्चस्तरीय समितीनं ही मंजुरी दिली आहे. त्यात महाराष्ट्राला ३५५ कोटी रूपये, आंध्रप्रदेशला ३५१ कोटी, हिमाचल प्रदेशला ११२ कोटी, कर्नाटकाला ४९२ कोटी, तमिळनाडूला ३५३ कोटी तर पुद्दुचेरीला १८ कोटी रूपये मंजूर झाले आहेत.