इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या चार जणांना एनआयएकडून पुण्यात अटक
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या चारजणांना पुण्यातून अटक केली. अब्दुल्ला बासिथ, सादिया अन्वर शेख, नबिल सिद्दिक खत्री आणि अब्दुर रहमान अशी त्यांची नावं आहेत. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून इसिसच्या विचारसरणीचा प्रचार करायचा कट रचणं, इसिससाठी सेल स्थापन करणं, निधी उभारणं, शस्त्रं गोळा करणं, ओळखपत्र बनवणं आणि हत्या घडवून आणणं हे आरोप त्यांच्यावर आहेत.
एनआयएनं पुण्यात कोंढवा इथून तलहा खानच्या घरातून यासंदर्भातली कागदपत्रं आणि डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. दिल्लीतून या प्रकरणात जहांजैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग यांनाही एनआयएनं अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता सहा झाली आहे. एनआयएनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.