राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात दुर्मीळ गाड्यांचं प्रदर्शन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुन्या आणि दुर्मीळ गाड्या आणि मोटारसायकलींचं प्रदर्शन मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनच्या संकुलात असलेल्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात आज भरलं होतं. आझादी का अमृतमहोत्सवाच्या निमित्तानं चित्रपट संग्रहालयानं व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया या संस्थेसोबत या प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पिढ्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यामुळे आणि केलेल्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्याची फळं चाखत असल्याची जाणीव आजच्या पिढ्यांना व्हावी, हा आझादी का अमृतमहोत्सव साजरा करण्यामागची संकल्पना असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा सेखर यांनी यावेळी बोलताना सांगितलं.