देशात १२ ते १४ वयोगटातल्या लाभार्थ्यांचं लसीकरण बुधवारपासून सुरु
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्यापसून देशात १२ ते १४ वयोगटातल्या लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरवात होणार आहे. मुंबईत १२ समर्पित केंद्रांवर २ दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी १२ वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहील. त्या नंतर या केंद्रांचा अभ्यास करुन अढचणी आणि प्रतिसाद यांचा आढावा घेतला जाईल, आणि नंतर आरोग्य सुविधांसह सर्वच केंद्रांवर लसीकरण पुर्ववत केलं जाईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या विविध शाळा, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळे आदींचेही सहकार्य घेतलं जाणार आहे, असंही या अधिकाऱ्यानं सागितलं.