डिजीटल चलन प्रत्यक्ष बाजारात आणायच्या धोरणावर RBI चं काम सुरु
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेचं डिजीटल चलन प्रत्यक्ष बाजारात आणायच्या टप्पेनियहाय धोरणावर रिझर्व्ह बँकेनं काम सुरु केलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका लिखीत उत्तरात दिली. हे चलन विनाअडथळा आणता येईल, अशा योग्य परिस्थितीचाही रिझर्व्ह बँक विचार करत आहे असं त्यांनी सांगितलं. डिजीटल चलन प्रत्यक्ष बाजारात आल्यानं रोख रकमेवरचं अवलंबित्व कमी होईल असंही चौधरी यांनी म्हटलं आहे.