पुणे विमानतळावर वाढीव क्षमता आणि एकात्मिक टर्मिनल इमारतीचं बांधकाम सुरू असल्याची नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची माहिती
Ekach Dheya
पुणे : पुणे विमानतळावर वाढीव क्षमता आणि जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचं बांधकाम सुरू असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे या भारतीय विमनतळ प्राधिकरणाच्या विमानतळावर गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. नवी इमारत बांधण्यासाठी ४७५ कोटी रूपये खर्च येणार आहे. ५५ टक्के काम पूर्ण झालं असून पुढच्या वर्षी ऑगस्टपर्यंत काम पूर्ण होईल.