राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पदम पुरस्कारांचं वितरण झाल. यंदा या पुरस्कारांसाठी १२८ जणांची निवड झाली होती. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, उद्योजक नटराजन चंद्रशेखर आणि सायरस पुनावाला यांना पद्मभूषण, तर आंतरार्ष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर हिम्मतराव बावस्कर, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. भिमसेन सिंघल, ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण, अनिल कुमार राजवंशी यांना पद्मभूषण पुरस्काराचा समावेश आहे. यंदाच्या पुरस्कारांमधले १० पुरस्कार मरणोत्तर दिले गेले यात राज्यातील आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतले तज्ञ डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मभूषण मिळाला आहे. ३४ पुरस्कार महिलांना आणि १० परदेशी तसंच अनिवासी भारतीय नागरिकांना मिळाले आहेत.