Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणात १८२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

LUCKNOW, MAR 4 (UNI):-Senior setizen being administered COVID-19 vaccine at Civil Hospital in Lucknow on Thursday. UNI PHOTO-LKW PC8U

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८२ कोटीपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८२ कोटी २५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर २ कोटी ७ लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ९ कोटी २७ लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६२ लाख ५२ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. देशभरात आज सकाळपासून २० लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून २ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५ कोटी ९२ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ६ कोटी ९४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत. तर १७ लाख १७ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६० लाख ३५  हजारापेक्षा जास्त, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ४ लाख ७८ हजारापेक्षा जास्त  मात्रा मिळाल्या आहेत.

Exit mobile version