राज्य सरकारकडून शेतकरी, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही – देवेंद्र फडनवीस यांचा आरोप
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कोणतीही घोषणा केली नाही, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. वॉटर ग्रीड संदर्भात सरकारची भूमिका नकारात्मक आहे, इतर राज्यांनी पेट्रोल आणि डिझेल वरचे कर कमी केले असले तरी राज्य सरकारनं ते कमी केले नाहीत, यावरून आघाडी सरकार दुटप्पी असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात मांडलेल्या कोणत्याही मुद्द्यावर आपल्या भाषणात उत्तर दिलं नाही, घोटाळे आणि भ्रष्टाचार या विषयावर शेवटपर्यंत कोणीही बोललं नाही, नवाब मलिक यांचं समर्थन करण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे, त्यामुळे आघाडी सरकारचं खरं रूप उघड झालं, असं त्यांनी सांगितलं.