भारताची वस्तू आणि सेवा निर्यात 650 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोचणार – पियुष गोयल
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात येत्या आर्थिक वर्षात साडेसहाशे अब्ज डॉलर्सचं लक्ष गाठेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत फायनान्शिअल एक्सप्रेसनं आयोजित केलेल्या 2022 पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते पी एल आय अर्थात उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना आणि प्रधानमंत्री गती शक्ती योजना हे भारताला उच्च स्तरावर घेऊन जातील असं ते म्हणाले. आत्मनिर्भर भारत हे भारताला जागतिक स्तरावर बलशाली बनवण्याकरता भारताच्या आत्मविश्वासाचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताचा सर्व क्षेत्रातला आंतरराष्ट्रीय व्यापार 1 हजार 350 अब्ज डॉलर्सपर्यंत पोचला असल्याबद्दल त्यांनी उद्योग जगताची प्रशंसा केली आहे जगातला कोणताही देश लक्षणीय आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय प्रगती गाठू शकत नाही असं गोयल यांनी म्हटलं आहे.