विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं – राज्यपाल
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं, असं मत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी काल व्यक्त केलं. राज्यातील ११ पारंपरिक विद्यापीठांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून सुरु झालेल्या स्टार्टअपचा त्यांनी काल राजभवन इथं झालेल्या बैठकीत आढावा घेतला. मुंबई, पुणे, नागपूर यांसह विविध विद्यापीठांमधील इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि लिंकेजेस विभागांच्या संचालकांसोबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी राज्यपालांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांच्या कार्याचं कौतुक केलं. तसच विद्यापीठांनी परस्परांकडून शिकावं अशी अपेक्षा व्यक्त केली.