Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पश्चिम बंगालमधल्या बीरभूम हत्याकांड प्रकरणी सीबीआयची चौकशी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालमधल्या बीरभूम हत्याकांड प्रकरणी सीबीआयनं चौकशी सुरु केली आहे. बीरभूम जिल्ह्यातल्या बोगतुई गावात २१ मार्चला काही अज्ञात व्यक्तींनी १० घरं पेटवली. त्यात ८ लोकांचा मृत्यू झाला. सीबीआयच एक पथक  बोगतुई गावात पोचलं.

या पथकात सुमारे २० सदस्य असून त्यांनी जळालेल्या घरांची पाहणी केली. सीएसएफएल अर्थात केंद्रीय न्यायपूरक विज्ञान प्रयोग शाळेच्या तज्ञानी या जळालेल्या घरांना भेट दिली. आणि तिथले नमुने गोळा करायला सुरुवात केली. कलकत्ता उच्च न्यायालयानं शुक्रवारी या प्रकरणाचा तपास सीबीआय पुढं सोपवला, आणि ७ एप्रिलपर्यंत प्रगती अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

Exit mobile version