भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्य़ातला व्यापार करार येत्या मे महिन्यापासून अंमलात येण्याची शक्यता
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्य़ातला व्यापार करार येत्या मे महिन्यापासून अंमलात येण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारीला उभय देशांनी या करारांवर सह्या केल्या होत्या दिल्लीमध्ये उभय देशांच्या आभासी शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यात हा करार झाला होता.
दोन्ही देशांमधला व्यापार पुढच्या पाच वर्षात १०० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढवणं हा या कराराचा उद्देश आहे. हा ऐतिहासिक करार असून, दोन्ही देशांची भागीदारी आंतरराष्ट्रीय मंचावर मजबूत करण्याची, तसंच लोकांच्या जीवनात बदल आणण्याची संयुक्त रुपरेखा म्हणजे हा करार आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. भारत आणि संयुक्त अमिरात एकत्रितपणे उज्वल भविष्य निर्माण करतील, गोयल यांनी केलं आहे.